मनीला : सीमा शुल्क विभागाच्यावतीने जप्त करण्यात आलेली ४,००० मेट्रिक टन साखर विक्री करण्याच्या शुगर नियामक प्रशासनाच्या निर्णयावर सेन रिसा होन्टिवरोसने प्रश्न उपस्थित केले आहेत. होन्टिवरोसने म्हटले आहे की, याऐवजी सरकारने समाज कल्याण आणि विकास विभागाच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना आणि आपदग्रस्त, पीडितांना तस्करी केलेली साखर वितरीत करण्याची गरज आहे. सरकारला अवैध वस्तूंपासून नफा कशासाठी हवा आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तस्करीच्या वस्तूची विक्री करणे हे साखरेचे चढे दर कमी करण्याचा उपाय नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
शुगर नियमाक प्रशासनाने (एसआरए) कडिवा स्टोअर्समध्ये तस्करी केलेली ४,००० मेट्रिक टन साखर विक्रीचा प्रस्ताव तयार केला आहे. तस्करी केलेली साखर मे महिन्यापर्यंत कडिवा स्टोअर्सच्या माध्यमातून विक्री केली जाईल. सरकारकडून गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या या स्टोअर्सचा उद्देश शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत कमी किमतीत नेण्यासाठी मदत करण्याचा आहे. त्यामुळे सेन रिसा होन्टिवरोसने सरकारच्या जप्त साखर विक्रीच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.












