सांगली : ग्रीन पॉवर शुगर्स लि. (गोपूज) कारखान्याने चालू गळीत हंगाम २०२५-२६ च्या पहिल्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या उसाला प्रतिटन ३३०० रुपयांप्रमाणे ऊसबिलाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती कारखान्याचे मुख्य प्रवर्तक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी दिली.
ते म्हणाले, “चालू गळीत हंगामातील पहिल्या पंधरवड्यात गाळपासाठी आलेल्या उसाचे प्रतिटन ३३०० रुपयांप्रमाणे बिलाची रक्कम थेट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केली आहे. ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही. सर्व प्रकारची देयके वेळेवर देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.” “यावर्षी ऊस उत्पादकांना आर्थिक दिलासा मिळावा यासाठी कारखाना प्रामाणिकपणे पुढाकार घेत आहे. कारखाना सुरळीत व पूर्णक्षमतेने कार्यरत असून, गळिताचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सभासद, शेतकरी बांधवांनी ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा,” असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.

















