रुद्रपूर : ऊस उत्पादक शेतकरी संस्थेच्यावतीने सतुईया गावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात काशीपूर ऊस संशोधन संस्थेचे संशोधक डॉ. प्रमोद कुमार यांनी लाल सड रोगाने होणारे पिकाचे नुकसान पाहता शेतकऱ्यांनी को ०२३८ या प्रजातीच्या बियाण्याऐवजी सोईएल के १४२०१, सीओएस १३२३५, सीओ १५०२३, सीओ पंत १२२२१, सीओ पंत १२२२६ या प्रजातीच्या बियाण्यांची लागवड करावी असे आवाहन केले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, प्रशिक्षण कार्यशाळेत डॉ. सिद्धार्थ कश्यप यांनी उसावरील लाल सड रोग, पोक्का बोईंग या रोगांसह किडींपासून कसा बचाव करावा याबाबत माहिती दिली. ज्येष्ठ ऊस विकास निरीक्षक महेंद्र यादव यांनी कृषी विभागाच्या योजनांची माहिती दिली. कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त ऊस उत्पादन कसे घेता येईल, त्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबाबत मौलिक मार्गदर्शन करण्यात आले. या शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेस रिना नौलिया, सोहनलाल, अशोक कुमार, राजेश कुमार आदी उपस्थित होते.
















