गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने आता आपल्या डिव्हिटंडच्या रक्कमेत बदल केला आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आधी ९.१० रुपये प्रती शेअर डिव्हिडंट देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता कंपनीकडून गुंतवणूकदारांना ११.४५ रुपये डिव्हिडंट दिला जाणार आहे. या वृत्तानंतर गुजरात मिनरल डेव्हलपमेंटच्या शेअरच्या दरात २ टक्के तेजी दिसून आली.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कंपनीने या डिव्हिडंटची तारीख निश्चित केली आहे. पुढील काही काळात या तारखेची घोषणा केली जाऊ शकते. शुक्रवारी कंपनीचा शेअर १७७ रुपयांच्या स्तरावर बंद झाला. गेल्या सहा महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये २५ टक्के तेजी दिसून आली आहे. शेअर बाजारात कंपनीचा ५२ आठवड्याचा उच्चांक १८७.९० रुपये प्रती शेअर आहे. तर ५२ आठवड्याचा निच्चांक १२२.७० रुपये प्रती शेअर आहे. गुजरात मिनरल्सच्या पहिल्या तिमाहीचा निकाल फारसा चांगला नाही. कंपनीचा रेव्हेन्यू घटून ७६६ कोटी रुपयांच्या स्तरावर आला आहे. एक वर्षापूर्वी या तिमाहीत ११५५ कोटी रुपयांचा महसूल कंपनीला मिळाला आहे.












