निपाणी : हालसिद्धनाथ साखर कारखान्याने माजी खा. अण्णासाहेब जोल्ले आणि आ. शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले आहेत. जीव मौल्यवान आहेत, ते परत आणता येत नाहीत.
कुटुंबाच्या स्वावलंबनासाठी हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने आखलेली अपघात विमा योजना दूरदर्शी आहे, असे प्रतिपादन कणेरी सिद्धगिरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी यांनी केले. कारखान्यातर्फे मृत सदस्यांच्या वारसांना अपघात विमा धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमात बुदिहाळ गावातील कारखान्याचे सदस्य संजय जाधव यांचा १९ रोजी दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना ५ लाख रुपये धनादेश देण्यात आला. यावेळी आ. शशिकला जोल्ले म्हणाल्या, सभासदांना आवश्यक सुविधा पुरवण्याचे कारखान्याचे उद्दिष्ट आहे. भरपाईच्या रकमेचा योग्य वापर करून कुटुंबाला स्वावलंबी बनवावे. कार्यक्रमावेळी वीरुपाक्षलिंग मठाचे कारखान्याच्या प्राणलिंग स्वामी, सदलगा येथील गीताश्रम मठाचे श्रद्धानंद स्वामी तसेच कारखान्याचे अध्यक्ष एम. पी. पाटील, उपाध्यक्ष पवनकुमार पाटील, संचालक अविनाश पाटील, प्रकाश शिंदे, समीत सासणे, जयवंत भाटले, किरण निकडे आदी उपस्थित होते.