कुरुक्षेत्र : उसाच्या किमतीत वाढ करण्याच्या मागणीसाठी हरियाणामध्ये भारतीय किसान युनियन (चारुनी) ने आंदोलन गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे. किसान संघाने बुधवारी कुरुक्षेत्रमधील आपल्या राज्य समितीची बैठक घेतली आणि आपल्या मागण्यांबाबत दबाव वाढविण्यासाठी निदर्शने करण्याचा निर्णय घेतला.
युनियनने उसाचे राज्य समर्थन मूल्य (एसएपी) वाढवून ४५० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी केली आहे. तर सध्या उसाचा दर ३६२ रुपये प्रती क्विंटल आहे. बिकेयू (चारुनी)चे अध्यक्ष गुरनाम सिंह यांनी सांगितले की, राज्य सरकारने आतापर्यंत उसाच्या दरात वाढ केलली नाही. गळीत हंगाम गेल्या महिन्यात सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्यावतीने या विषयावर निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, काहीच फायदा झालेला नाही. आता शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणाले की, जर किमतीत वाढ केली गेली नाही, तर शेतकरी २९ डिसेंबर रोजी आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करील. निवेदन देतील आणि सरकारच्या प्रतिमेचे दहन करतील.















