हरियाणा : उसाला प्रति क्विंटल ५०० रुपये दर देण्याची माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा यांची मागणी

चंडीगड : राज्य सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांनी केला आहे. उसाचा किमान आधारभूत किंमत ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य सरकारने २० सप्टेंबरपासून भात खरेदी सुरू करावी आणि बाजार शुल्क ४ टक्क्यावरून १ टक्क्यापर्यंत कमी करावे असे आवाहनही त्यांनी केले. बाजार शुल्क कमी केल्याने साखर कारखाने इतर राज्यात स्थलांतरित होण्यापासून थांबतील आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे ते म्हणाले.

याबाबत हुड्डा म्हणाले की, अलीकडील पुरामुळे ३० लाख एकर शेती क्षेत्र प्रभावित झाले असून सुमारे ५१०,००० शेतकरी बाधित झाले आहेत. शेतकऱ्यांना प्रति एकर सरासरी १ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सरकारने भरपाई दिली पाहिजे. सरकारने खतांच्या किमतीपेक्षा कमी भरपाई दिल्याचा आरोप त्यांनी केला. प्रति एकर ६०,००० ते ७०,००० रुपयांची भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी हुड्डा यांनी राज्याच्या मदत निधीत आपला एक महिन्याचा पगार दिला आणि इतर आमदारांनाही असेच करण्याचे आवाहन केले. सरकारने कालवे, नाले, पाईपलाईन आणि बंधाऱ्यांची वेळेवर साफसफाई न झाल्यामुळे गावे आणि शहरे पाण्याखाली गेल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारच्या दुर्लक्षामुळे पुराचा तडाखा आणखी वाढला असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here