हरयाणा : ऊस शेतीच्या विकासासाठी सरकार शेतकऱ्यांना देणार प्रोत्साहन अनुदान

कर्नाल : आसंध येथील हाफेड साखर कारखान्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांना २०२५-२६ मध्ये अधिसूचित उसाच्या जातींची लागवड करण्यासाठी प्रति एकर ३,००० ते ५,००० रुपये प्रोत्साहन दिले जाणार आहे. ऊस तंत्रज्ञान अभियान योजनेअंतर्गत हे अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकडोळा पद्धतीने ऊस लागवडीसाठी प्रति एकर तीन हजार रुपये आणि बियाणे रोपवाटिका तयार करण्यासाठी प्रति एकर पाच हजार रुपये दिले जाणार आहेत.

याचबसोबर को १५०२३ या उसाच्या जातीच्या लागवडीसाठी प्रति एकर पाच हजार रुपये आणि १५०२३ या प्रजातीची विक्री करणाऱ्या शेतकऱ्याला प्रति एकर पाच हजार रुपये अनुदान म्हणून दिले जाणार आहे. याबाबत माहिती देताना सहाय्यक ऊस विकास अधिकारी डॉ. सूरज भान यांनी सांगितले की अनुदान मिळविण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत संबंधीत शेतकऱ्यांना कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या http://www.agriharyana.gov.in/ वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. तरच या अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here