हिंगोली : उसाच्या घटत्या उत्पन्नामुळे शेतकरी चिंतेत; एकरी ४० हजारांपासून लाखापर्यंत फटका

हिंगोली : सततचा पाऊस, वातावरणातील बदल आणि रोगराई यामुळे पंदा उसाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. आडसाली उसाच्या क्षेत्रात एकरी सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा, तर खोडवा उसाच्या उत्पत्रात सुमारे ४५ हजार रुपयांचा फटका शेतकन्यांना बसला आहे. वसमत तालुक्यात दरवर्षी उसाच्या उत्पादनात होणारी घट शेतकरी आणि साखर कारखानदारीसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

महापुराच्या भीतीमुळे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उसाची बियाण्यासाठी विक्री केली जाते. तालुक्यातून वाहणाऱ्या पूर्णा नदीमुळे शेती समृद्ध झाली असली, तरी पावसाळ्यात हीच नदी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. अलीकडच्या काळात खते, बी-चियाणे, औषधे, मजुरी आदीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्याचवेळी उसाचे घटते उत्पादन आणि त्याचा बेट उत्पन्नावर होणारा परिणाम यामुळे ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

यंदा महापुराच्या धोक्याबरोबरच सततचा पाऊस, शेतातील अधिक ओलावा आणि रोगराई यांचा मोठा फटका ऊस पिकाला बसला आहे. सध्या ऊस हंगाम जोमात सुरू असता, तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सध्या मोठ्या प्रमाणावर यंत्राच्या साह्याने ऊसतोड सुरु आहे. मात्र जमिनीत अद्यापही ओलावा असल्याने यंत्रतोड करताना ऊस मुळासकट उपटला जात आहे. याचा परिणाम पुढील खोडवा उत्पादनावर होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here