हिंगोली : बळिराजा कारखान्याची गाळप क्षमता झाली दुप्पट, आता प्रतिदिन ७,५०० मे.टन ऊस गाळप

हिंगोली : काननखेड येथील बळीराजा साखर कारखान्याच्या २०२५-२६ हंगामाचे रोलर पुजन संचालक दिनकर उर्फ आप्पासाहेब जाधव यांच्या हस्ते उत्साहात झाले. संचालक जाधव यांच्या हस्ते विधिवत रोलरची पुजा करण्यात आली. आगामी गळीत हंगामासाठी कारखान्याने गाळप क्षमता ३५०० मेट्रिक टनावरून वाढवून प्रतिदिन ७,५०० मेट्रिक टन केली आहे, ही या भागातील उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब आहे.

याबाबत कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव म्हणाले की, पूर्वी साखर कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ३५०० मेट्रिक टन एवढी होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळपास नेण्याची इच्छा असूनही ते शक्य होत नव्हते. गाळप क्षमता वाढविण्याची शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार युद्धपातळीवर काम हाती घेण्यात आले. या हंगामात आपण प्रतिदिन ७,५०० मेट्रिक टन उसाचे गाळप करू शकणार आहे. यावेळी सरव्यवस्थापक भगवानराव मोरे, वर्क्स मॅनेजर तुकाराम सुरवसे, चिफ केमिस्ट कीरण मगर, मुख्य शेतकी अधिकारी रमेश पौळ, इलेक्ट्रीकल मॅनेजर नितीन गणोरकर, चिफ इंजिनिअर मदन देशमुख, सुरक्षा अधिकारी विनायक कदम, हेड टाइमकिपर गणेश सुर्यवंशी, ऊस पुरवठा अधिकारी विनायक कऱ्हाळे, रामजी शिंदे, बाळासाहेब तिडके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here