नंदुरबार, जळगावमध्ये सहा कारखान्यांकडून ऊस तोडणीस गती, ऊस लागवडीतही वाढ

नंदुरबार : खानदेशात ऊस तोडणीस गती आली असून, यंदा लागवडीतही वाढ होण्याची शक्यता आहे. नंदुरबारमध्ये चार व जळगावात दोन कारखाने सुरू असतात. ऊस लागवड नोव्हेंबरमध्ये सुरू झाली आहे. गेल्यावर्षी उसाची तोडणी वेळेत झाली. यंदाही तोडणी गतीने सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी या वर्षीदेखील ऊसलागवड केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून खांडसरी तसेच कारखाने यांच्याकडून उसाची तोडणी व गाळप बऱ्यापैकी होत आहे. यंदा पाऊस चांगला झाला आहे. अनेक प्रकल्पांतून रब्बीसाठी पाणी मिळत आहे. यामुळे अनेकांनी उसाला पसंती दिली आहे. कारखाने उसाचे बेणे आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहेत. ऊस लागवड वाढत आहे. त्यामुळे ऊस लागवड वाढत असल्याचे दिसते.

नंदुरबारमधील लागवड १४ हजार ते १४ हजार ५०० हेक्टरवर होईल, असे दिसत आहे. जळगावातील लागवडदेखील १३ ते १४ हजार हेक्टरपर्यंत राहणार आहे. तर धुळ्यातील लागवड साडेचार ते पाच हजार हेक्टरवर होईल. दोन्ही जिल्ह्यात मिळून सुमारे ५०० ते ७०० हेक्टरने ऊस लागवडीत वाढ होईल अशी चिन्हे आहेत. या जिल्ह्यांतील शेतकरी कापूस व अन्य भाजीपाला पिके परवडत नसल्याने ऊस लागवडीकडे वळले आहेत. चांगले उत्पन्न देणारे आणि कमी खर्च, कमी जोखमीचे पीक म्हणून उसाची लागवड शेतकरी करीत आहेत. पपई, केळी आदी पिकांना पर्याय म्हणून तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांकडून उसाला प्राधान्य देण्यात येते. जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, चाळीसगाव, भडगाव, मुक्ताईनगर, धुळ्यात शिरपूर, साक्री, धुळे, नंदुरबारमध्ये शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा भागांत ऊस पीक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here