नवी दिल्ली : देशभरात जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रकोप अद्याप सुरूच आहे. गेल्या २४ तासात देशभरात नवे ८ हजार ३०६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर २११ जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचे २१ रुग्ण आढळून आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरात ९८ हजार ४१६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर कोरोना महामारीत जीव गमावलेल्यांची संख्या ४ लाख ७३ हजार ५३७ झाली आहे. आकडेवारीनुसार, काल ८,८३४ जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यानंतर आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३ कोटी ४० लाख ६९ हजार ६०८ झाली आहे. आतापर्यंत राष्ट्रीय लसीकरण मोहिमेंतर्गत १२७ कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात २४ लाख ५५ हजार ९११ लसी देण्यात आल्या. त्यानंतर आतापर्यंत एकूण १२७ कोटी ९३ लाख ९ हजार ६६९ डोस देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. देशात ओमिक्रॉनचे १७ रुग्ण आढळेल असून राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये ९, महाराष्ट्रात पुण्यातील ७ आणि दिल्लीतील एकाचा यात समावेश आहे.











