उस्मानाबाद : जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रिज लिमिटेडने आपल्या एकूण १०,००० हेक्टर क्षेत्रातील ऊसापैकी ६,००० हेक्टर क्षेत्रात ठिबक सिंचन लावण्यात यश मिळवले आहे.
Indianexpress.com मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, कारखान्याचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील ऊसापैकी हे ठिबक सिंचनाचे मोठे क्षेत्र आहे. कारखान्याने ठिबक सिंचनाद्वारे ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १० रुपये अधिक दर देण्याचे जाहीर केल्यानंतर पाणी व्यवस्थापन सुधारले आहे असे दावा ठोंबरे यांनी केले. आर्थिक फायदा, कारखान्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न यातून एकूण ऊस क्षेत्रापैकी ६० टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचन बसविण्यात यश मिळाले आहे.
दुष्काळी मराठवाडा भागात पाण्याची प्रचंड टंचाई असते. या भागात वर्षभरात केवळ ७८० मिलीमिटर पाऊस होतो. शेतकऱ्यांना उन्हापासून बचावासाठी आणि आपली पिके टिकवण्यासाठी विहीरी, विंधन विहिरींचा वापर करावा लागतो. मात्र, वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे पिकांचे नुकसान होते. त्यामुळे पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक दर देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ठोंबरे म्हणाले. गेल्या दहा वर्षांपासून ठिबक सिंचनाद्वारे ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल १० रुपये अधिक एफआरपी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link













