पलवल : शेतकऱ्यांची जीवनदायीनी मानला गेलेल्या साखर कारखाना यंदा जादा क्षमतेने चालविला जाणार आहे. कारखाना २४ तासांत २२ हजार क्विंटल उसाचे गाळप करेल. यापूर्वी या कारखान्याची गाळप क्षमता १९ हजार क्विंटल होती. गाळप क्षमता वाढीसाठी सर्व प्रकारची औपचारिकता कारखाना प्रशासनाने पूर्ण केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राष्ट्रीय महामार्ग १९ वर बामनीखेडाजवळ सरकारने साखर कारखाना सुरू केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कारखाना शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करून त्याची विक्री करतो. याचा शेतकऱ्यांना फायदाही होत आहे. शेतकरी ऊस विक्री करून आपल्या कुटुंबांचे पोषण करीत आहेत. या विभागातील शेतकरी रामेश्वर, विनोद कुमार, ललती शर्मा, विष्णू यांसह इतरांनी सांगितले की, सरकारने आता कारखान्याची गाळप क्षमता वाढवल्यामुळे आम्हाला आर्थिक मदत झाली आहे. खरेतर खूप आधीच कारखान्याची गाळप क्षमता कमी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊस गाळपाच्या प्रतीक्षेत थांबावे लागत होते. यावेळी जिल्ह्यात जवळपास तीन हजार शेतकरी ऊस उत्पादन करीत आहेत. कारखान्याच्यावतीने यावेळी ४२ लाख १९ हजार क्विंटल उसाचे करार करण्यात आले आहेत. पूर्वी कारखाना एका दिवसात १९ हजार क्विंटल उसाचे गाळप करीत होता. आता त्याची क्षमता तीन हजार क्विंटलने वाढली आहे. २० नोव्हेंबरनंतर कारखाना सुरू होईल असे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.


















