भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार पूर्णत्वाच्या मार्गावर: केंद्रीय मंत्री पियुष गोयल

बर्न [स्वित्झर्लंड] : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल म्हणाले कि, भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार (FTA) लवकरच पूर्ण होऊ शकतो. स्वित्झर्लंडमध्ये स्विसमेम उद्योग दिनाच्या कार्यक्रमानंतर भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार वाटाघाटींबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, मला विश्वास आहे की भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आता फक्त काहीच मुद्दे शिल्लक राहिले आहेत.

गोयल यांनी युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन (EFTA), युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यासोबत भारताच्या यशस्वी व्यापार करारांना परस्पर फायदेशीर, निष्पक्ष आणि संतुलित दृष्टिकोनाची उदाहरणे म्हणून अधोरेखित केले. “ज्या भावनेने आम्ही EFTA ला अंतिम रूप दिले, त्याच भावनेने आम्ही UK किंवा ऑस्ट्रेलिया किंवा संयुक्त अरब अमिरातीसोबत NFT ला अंतिम रूप दिले, त्याच भावनेने परस्पर फायदेशीर, निष्पक्ष आणि संतुलित करार, EU ब्लॉक आणि भारताच्या अर्थव्यवस्थांना समर्थन देईल, असे गोयल म्हणाले. गोयल पुढे म्हणाले की, दोन्ही बाजूंमधील करार भारत आणि EU च्या वेगवेगळ्या विकास टप्प्यांचा विचार करेल आणि विकासाच्या संधी उघडेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here