“भारताने आम्हाला टॅरिफ लादून मारले”: नवी दिल्लीने “नो टॅरिफ” करार देऊ केल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की, भारताने अमेरिकेला “नो टॅरिफ” करार देऊ केला आहे. तसेच त्यांनी भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ लादण्याच्या त्यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. द स्कॉट जेनिंग्ज रेडिओ शोवरील एका टेलिफोन मुलाखतीत ट्रम्प यांनी दावा केला की, भारत हा जगातील सर्वात जास्त टॅरिफ लावणारा देश आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले कि, चीन आपल्याला टॅरिफ लावून मारतो, भारत आपल्याला टॅरिफ लावून मारतो, ब्राझील आपल्याला टॅरिफ लावून मारतो. मला त्यांच्यापेक्षा जास्त टॅरिफ समजले आहेत. मला जगातील कोणत्याही मानवापेक्षा जास्त टॅरिफ समजले. भारत हा जगातील सर्वात जास्त टॅरिफ लावणारा देश होता आणि तुम्हाला माहिती आहे काय, त्यांनी मला आता “नो टॅरिफ” ऑफर देऊ केली आहेजर माझ्याकडे टॅरिफ नसता तर ते कधीही ती ऑफर देणार नाहीत. म्हणून तुम्हाला टॅरिफ लावावेच लागतील, असा दावाही त्यांनी केला.

काही लोकांना हे समजते की आम्ही भारतासोबत खूप कमी व्यवसाय करतो, परंतु ते आमच्यासोबत प्रचंड प्रमाणात व्यवसाय करतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ते आम्हाला मोठ्या प्रमाणात वस्तू विकतात, त्यांचा सर्वात मोठा “ग्राहक” आम्ही आहोत, परंतु आम्ही त्यांना खूप कमी विकतो. आतापर्यंत हा पूर्णपणे एकतर्फी संबंध आहे आणि तो अनेक दशकांपासून सुरु आहे. भारताने आतापर्यंत आमच्याकडून इतके उच्च शुल्क आकारले आहे, जे कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे, असे ते म्हणाले. अमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जेक सुलिव्हन यांनी आरोप केला आहे की, ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबतचे वैयक्तिक व्यावसायिक हितसंबंध भारतावर टेरिफ लावले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here