इंडोनेशियामध्ये सध्या कोरोना विषाणूच्या फैलावामुळे लॉकडाऊन सुरू आहे. यांदरम्यान, व्यापार मंत्री मोहम्मद लुफ्ती यांनी सांगितले की, देशात साखरेसह अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असून अनेक दिवस चिंता करण्याचे काही कारण नाही.
कोरोनामुळे ३ जुलैपासून २० जुलैपर्यंत निर्बंध लागू केले गेले आहेत. व्यापार मंत्र्यांनी सांगितले की, या काळात दर स्थिर राहतील आणि आम्ही उत्पादनांची मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाबींवर लक्ष ठेवून आहेत. लुफ्ती यांनी सांगितले की, देशाची खरेदी एजन्सी बुलॉगकडे सद्यस्थितीत १.३९ मिलीयन टनाचा तांदुळचा साठा आहे. आयात न करता किमान तो स्थिर दराने एक वर्ष विक्री करण्यासाठी पुरेसा आहे.
इंडोनेशियामध्ये डेल्टा व्हायरसच्या संक्रमणामुळे धास्ती वाढली आहे. सद्यस्थितीत तेथे ऑक्सिजनची कमतरता भासत असून मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. देशात कोरोना विषाणूचा फैलाव कमी करण्यासाठी अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link















