जकार्ता : इंडोनेशिया सरकारने पुढील वर्षी ९,९१,००० टन सफेद साखर आयात करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती व्यापार मंत्री जुल्किफली हसन यांनी दिली. ते म्हणाले की, संबंधीत मंत्रालय आणि संस्थांच्या दरम्यान झालेल्या एका बंद बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आयात केली जाणारी ९,९१,०० टन सफेद साखर थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाईल. या वर्षी सरकारने ५,००,००० टन साखर आयातीचे परवाने जारी केले. मात्र, केवळ ३,००,००० टन साखर आयात करण्यात आली आहे.
इंडोनेशियाने ५ वर्षात साखर उत्पादनात आत्मनिर्भरता मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राष्ट्रपती जोको विडोडो यांनी अलिकडेच सांगितले होते की, इंडोनेशियामध्ये पुढील पाच वर्षात आत्मनिर्भर बनविण्याचे प्रयत्न करण्यासाठी आपल्या साखर बागायतीच्या क्षेत्राचा विस्तार करतील आणि नंतर साखरेवर आधारित इथेनॉल उत्पादनावर भर देतील.












