नवी दिल्ली : खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती आणि महागड्या इंधनामुळे किरकोळ महागाईचा दर १८ महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. एप्रिल महिनयात किरकोळ महागाईचा आकडा ७ टक्क्यांवर पोहोचला आहे. सांख्यिकी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२२ मध्ये किरकोळ महागाईचा दर ७.७९ टक्के राहीला. तर मार्च २०२२ मध्ये हाच दर ६.९५ टक्के होता. यापूर्वी किरकोळ महागाईचा दर सप्टेंबर २०२० मध्ये ७.३४ टक्के इतका उच्च होता.
याबाबत एबीपी लाईव्ह डॉट कॉमवर प्रकाशित वृत्तानुसार, किरकोळ महागाईचा दर ७.५० टक्क्यांच्याही वर पोहोचला आहे, तर आरबीआयच्या महागाईचा दरासाठी तयार केलेली वरिष्ठ मर्यादा ६ टक्क्यांची आहे. एप्रिल महिन्यात पत धोरण समितीच्या निर्णयाची घोषणा करताना आरबीआयने २०२२-२३ मध्ये महागाईटा दर ५.७ टक्के राहण्याचे अनुमान वर्तवले होते. एनएसओकडील डाटानुसार शहरी भागात महागाईत जबरदस्त वाढ दिसून आली आहे. मार्च २०२२ मध्ये शहरी भागात किरकोळ महागाईचा दर ८.३८ टक्के होता. तर ग्रामीण भागात किरकोळ महागाईचा दर ७.०९ टक्के होता. रशिया-युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली आहे. २२ मार्च २०२२ पासून सरकारी तेल कंपन्यांनी इंधन दरात वाढ केली. त्यानंतर पेट्रोल, डिझेलमध्ये १० रुपयांची वाढ झाली आहे. डिझेल महागल्याने वाहतुकीत दरवाढ झाली आहे. एक एप्रिलपासून घरगुती गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. महागड्या डिझेलमुळे माल वाहतूक १० टक्क्यांनी वाढली आहे. दरम्यान, यामुळे आता कर्जे महाग होण्याची शक्यता आहे.











