शामली : शामली साखर कारखान्याने सितापूरमधील बिस्वा साखर कारखान्याकडून टर्बाइन मागवून इंजिनीअर्सकडून ते बसविण्याचे काम सुरू केले आहे. जेव्हा हे टर्बाइन बसवून पूर्ण होईल, त्यानंतर लगेच गाळप आपल्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचेल. कारखान्याची एकूण गाळप क्षमता ७५ हजार क्विंटल प्रती दिन आहे. मात्र, सध्या खराब टर्बाइनमुळे सध्या ४० ते ४५ हजार क्विंटल प्रती दिन गाळप केले जात आहे.
लाइव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गाळप क्षमता कमी झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २९ नोव्हेंबर रोजी कारखान्यात टर्बाइन जॉइंट तुटल्याने कामगार गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी कर्नालमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. शामली कारखान्याचे ऊस विभागाचे महाव्यवस्थापक सुशील खोखर, सहायक महाव्यवस्थापक दीपक राणा, जिल्हा ऊस अधिकारी विजय बहादूर सिंह आदींनी टर्बाइन बसविण्याच्या कामाची पाहणी केली. शेतकऱ्यांना तीन ते चार दिवसांत पूर्ण क्षमतेने गाळप होईल असे आश्वासन देण्यात आले.











