इंडियन शुगर मिल्स असोसिएशनची (इस्मा) आज बैठक झाली. यावेळी ऊस लागवड क्षेत्रातील वाढ आणि ऊस उत्पादनात अपेक्षित वाढ या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. देशभरातील साखर उत्पादक राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत उसाचे लागवड क्षेत्र, अपेक्षित उत्पन्न, साखर वसुली, मागील आणि चालू वर्षातील पावसाचा परिणाम, जलाशयांतील पाण्याची उपलब्धता, २०२२ मध्ये झालेला दक्षिण पश्चिम मान्सूनचा पाऊस आणि इतर अनुषंगिक बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. . आणि २०२२-२३ या हंगामासाठीचे पहिला आगाऊ अंदाजदेखील प्रसिद्ध करण्यात आला.
साखर उत्पादनाचा अंदाज तुम्ही खालील तक्त्यामध्ये पाहू शकता.
वरील तक्त्यावरून लक्षात येते की, २०२२-२३ च्या हंगामात इथेनॉलकडे वळविल्याशिवाय साखरेचे निव्वळ उत्पादन अंदाजे ४१० लाख टन, म्हणजे २०२१-२२च्या हंगामात ३९२ लाख टनांच्या तुलनेत सुमारे ५ टक्के जास्त होण्याची शक्यता आहे.
२०२२-२३ च्या हंगामात, १२ टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठणे अपेक्षित आहे. त्या अनुषंगाने एकूण ५४.५ कोटी लिटर इथेनॉलची गरज भासणार आहे आणि तेवढा पुरवठा केला जाईल.
भारतीय साखर उद्योग राष्ट्राच्या उभारणीसाठी कटिबद्ध आहे आणि सरकारने २०२२-२३ या हंगामासाठी निर्धारित केलेले इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी उद्योगाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. आणि म्हणूनच चालू हंगामात इथेनॉल उत्पादनाकडे जवळपास ४५ लाख टन साखर वळविण्यात येण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी उसाचा रस/सिरप आणि बी-हेवीचे इथेनॉलमध्ये रूपांतर झाल्यामुळे ४५ लाख टन साखर उत्पादनात झालेली कमतरता लक्षात घेऊन, ISMA ने २०२२-२३ या हंगामात सुमारे ३६५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला आहे.















