लंडन : अपेक्षेपेक्षा कमी साखर उत्पादनामुळे आंतरराष्ट्रीय साखर संघटनेने (आयएसओ) शुक्रवारी २०२२-२३ या हंगामासाठी जागतिक अतिरिक्त साखर साठ्याचे पुर्वानुमान कमी केले आहे. आयएसओच्या त्रैमासिक रिपोर्टमध्ये २०२२-२३ (ऑक्टोबर/सप्टेंबर) मध्ये ४.२ मिलियन टन अतिरिक्त साखर साठ्याचे अनुमान व्यक्त केले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये जारी केलेल्या यापूर्वीच्या ६.२ मिलियन टनाच्या पुर्वानुमानापेक्षा ते खूप कमी आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला जारी करण्यात आलेल्या व्यापारी आणि विश्लेषकांच्या एका रॉयटर्स पोलमध्ये २०२२-२३ हंगामासाठी ३.२५ मिलियन टन अतिरिक्त साठ्याचे पुर्वानुमान होते. आयएसओने सांगितले की, पुढील तीन महिन्यांसाठी आमचा मौलिक दृष्टिकोन न्यूट्रल टू बेअरिश ते न्यूट्रल असा बदलण्यात आला आहे. २०२२-२३ मध्ये आयएसओ अनुमानीत जागतिक उत्पादन १८०.४ मिलियन टनाच्या उच्चांकी स्तरावर पोहोचेल. हे उत्पादन याच्या पुर्वीच्या १८२.१ मिलियन टनाच्या अनुमानापेक्षा कमी आहे. भारताचे उत्पादन गेल्या ३५.५ मिलियन टन पुर्वानुमानावरुन ३४.२ मिलियन टन करण्यात आले आहे.















