इथेनॉलयुक्त पेट्रोलमुळे गाड्या खराब होतात हा निव्वळ गैरसमज : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्टोक्ती

नागपूर : E20 इंधन गाडीच्या इंजिनला नुकसान पोहोचवते किंवा वाहनांसाठी धोकादायक आहे, हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. जगातील अनेक देशांमध्ये अशाप्रकारचे इंधन यशस्वीरित्या वापरले जात आहे. एक विशेष पेर्टोलियम लॉबी आहे, जी खोटी माहिती पसरवत आहे आणि लोकांमध्ये गोंधळ निर्माण करत आहे असा आरोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. एका मुलाखतीत २० टक्के इथेनॉल असलेल्या पेट्रोलबद्दल उपस्थित होणाऱ्या शंकांवर गडकरी यांनी भाष्य केले. इथेनॉल वापरण्यावरून चुकीच्या गैरसमज पसरवला जात असून यामुळे सामान्य शेतकरी आणि जनतेचे नुकसान होत आहे, असा दावाही त्यांनी केला.

मंत्री गडकरी म्हणाले की, भारताने जुलै २०२४ मध्येच पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे लक्ष्य गाठले आहे. प्रदूषण कमी करणे आणि महागड्या कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे. हा निर्णय शेतकरी आणि देश दोघांसाठीही फायदेशीर आहे. गेल्या चार वर्षांत बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये मक्याचे उत्पादन तीन पटीने वाढले आहे. मक्याची किंमत प्रति टन १४-१५ हजार रुपयांवरून २४-२५ हजार रुपयांपर्यंत वाढली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये ही किंमत प्रति क्विंटल १,२०० रुपयांवरून २,८०० रुपयांपर्यंत वाढली आहे. ब्राझीलमध्ये २७ टक्केपर्यंत इथेनॉल मिसळले जाते, वाहनधारकांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही. आम्ही तांत्रिकदृष्ट्या सर्व तपासणी केली आहे. काही लोक पेट्रोलियम लॉबीशी संबंधित आहेत, जे खोटी माहिती पसरवत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here