गुरदासपूर : उन्हाळ्याच्या काळात ऊस पिकाची जपणूक करणे खूप महत्त्वाचे आहे. हलक्या जमिनीतील ऊस पिकावर लोह खनिजाची कमतरता भासते. त्यातून पिकाची वाढ खुंटते आणि हिरवी पाने पिवळी पडू लागतात. नंतर पानांच्या शिराही पिवळ्या पडतात अशी माहिती सहायक ऊस विकास अधिकारी डॉ. अमरिक सिंह यांनी दिली. सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील विविध गावांत ऊस पिकाची पाहणी करताना उत्पादक शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी कृषी अधिकारी डॉ. परमिंदर कुमार, कारखान्याचे सर्व्हेअर विक्रमजीत सिंह, बलजिंदर सिंह उपस्थित होते.
करवाल गावातील ऊस उत्पादक शेतकरी, शेतमजुरांना माहिती देताना डॉ. अमरिक सिंह यांनी सांगितले की, मे आणि जून महिना हे ऊस पिकासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मे-जून महिन्यात पिकांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. लोह खनिजाची कमतरता भासल्यास पाने पांढरी होतात. पिकाची वाढ खुंटते. जर पानांवर अशी लक्षणे दिसली तर एक किलो सल्फेट शंभर लिटर पाण्यात मिसळून आठवड्यातून दोन-तीन वेळा पानावर फवारावे.
दुकानदारांच्या सांगणावरून कोणत्याही किटकनाशकाचा वापर करू नका असे आवाहन डॉ. परमिंदर सिंह यांनी केले. जर काही अडचणी आल्यास शेतीतज्ज्ञांशी संपर्क साधावा. मार्गदर्शन केले जाईल असे त्यांनी सांगितले.











