जालना : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८ ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई

जालना:जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन करून ऊस वाहतूक केली जात होती. उपप्रादेशिक परिवहन विभागाने सोमवारी ८ वाहनांवर कारवाई करून ४४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. यात ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडून निष्काळजीपणे विना रिफ्लेक्टर वाहन चालवणे, क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणे, तसेच मोटार वाहन कायद्यातील इतर तरतुदींचे उल्लंघन करणे आदी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल, असे आरटीओकडून सांगण्यात आले. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल, मोटार वाहन निरीक्षक भीमराज नागरे, शुभम मोटे, अमोल राजपूत, आसाराम घुले, भागवत परिस्कर, निलेश आहीरे, अक्षय पाटील, सहायक मोटर वाहन निरीक्षक अर्शन खान आदींनी केली. या कारवाईने वाहतूक सुरळीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here