जालना : अंकुशराव टोपे समर्थ कारखान्यास अन्न सुरक्षा प्रणाली प्रमाणपत्र प्राप्त

जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर (ता.अंबड) कारखान्यास अन्न सुरक्षा प्रणाली प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या FSSC-22000 प्रमाणपत्रामध्ये ISO 22000:2018, ISO/TS 22002-1:2009 व FSSC 22000 (Version 6) या घटकांचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखर विकण्यासाठी FSSC 22000 चे प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यामुळे ग्राहकांचा उत्पादनावरील विश्वास वाढतो. उत्पादनात बिघाड होण्याची किंवा माल खराब होण्याची शक्यता नसते. FSSAI च्या नियमांचे पालन करणे सोपे जाते.

साखर कारखान्यांसाठी अन्न सुरक्षा प्रणाली प्रमाणपत्र आता जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेसाठी आणि ग्राहकांच्या विश्वासासाठी अनिवार्य झाले आहे. साखरेचा वापर केवळ थेट खाण्यासाठीच नाही, तर औषधे, शीतपेये आणि इतर खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. त्यामुळे तिची शुद्धता महत्त्वाची असते. अन्न सुरक्षा प्रणाली प्रमाणपत्रासाठी ऊस गाळप करण्यापासून ते साखर पॅकिंगपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर भौतिक (कचरा, धातूचे तुकडे), रासायनिक (कीटकनाशके) आणि जैविक (बॅक्टेरिया) धोक्यांची तपासणी करणे.,साखरेचा रंग, ओलावा आणि सल्फरचे प्रमाण ठरवून दिलेल्या मानकांनुसार राखणे. मशिनरी, कामगारांचे आरोग्य आणि कारखान्याचा परिसर स्वच्छ ठेवणे, रोजच्या उत्पादनाचे आणि गुणवत्तेचे रेकॉर्ड ठेवणे हे आवश्यक टप्पे असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here