बीड : एनएसएल शुगर्सच्या पुढाकाराने ऊस शेतीसाठी २ ठिकाणी ए.आय. हवामान केंद्र कार्यान्वीत

बीड : पवारवाडी येथील एनएसएल शुगर्सच्या पुढाकाराने माजलगाव तालुक्यातील गंगामसला व तेलगाव खुर्द येथे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रावर ऊस शेतीसाठी हवामान केंद्र उभारण्यात आले. शेतजमिनीत अत्याधुनिक सेन्सर बसवून शेती व्यवस्थापनाला तांत्रिक बळ देण्यात आले आहे.ए.आय. आधारित तंत्रज्ञानामुळे ऊस शेती अधिक वैज्ञानिक पद्धतीने करण्यास मदत होणार असून उत्पादन वाढीसोबतच पाण्याची बचत व खर्चात कपात होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तालुक्यातील शेती क्षेत्रासाठी हा उपक्रम मार्गदर्शक ठरणार असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.

हा उपक्रम केव्हीके बारामती, व्हीएसआय पुणे, फसल प्रा.लि. आणि एनएसएल शुगर्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने राबविला आहे. हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी अभिषेक मुंडे, एनएसएल शुगर्सचे जनरल मॅनेजर पारसनाथ जयस्वाल, असिस्टंट जनरल मॅनेजर दत्तात्रय आहेरकर, सहायक ऊस विकास अधिकारी विष्णू मालुरे, आदित्य सोळंके, मयूर आगे गंगामसला व तेलगाव खुर्द येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. एआय आधारित हवामान केंद्रामुळे ऊस पिकासाठी आवश्यक हवामानाची माहिती, जमिनीतील आर्द्रता, तापमान, आर्द्रतेची टक्केवारी आदी बाबींची अचूक नोंद मिळणार असून शेतकऱ्यांना योग्य वेळी सिंचन, खत व्यवस्थापन व रोगनियंत्रणाचे निर्णय घेणे सुलभ होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here