जालना : समृद्धी कारखाना तीन हप्त्यांत एफआरपी रक्कम देणार

जालना : समृद्धीसाखर कारखाना तीन हप्त्यांत एफआरपीनुसार रक्कम अदा करणार असल्याचे चेअरमन सतीश घाटगे यांनी सांगितले. समृद्धी साखर कारखान्याचे एकूण गाळप पाच लाख चार हजार ८९६ मेट्रिक टन एवढे झाले आहे. साखर उतारा ११ टक्के याप्रमाणे ढोबळ एफ.आर.पी. ३,८४४.८८/-रुपये प्रति मेट्रिक टन असा निघत आहे.

कारखान्याचा सरासरी ऊस तोडणी वाहतूक खर्च रुपये ८७४.८४ वजा जाता कारखान्याचा निव्वळ एफ.आर.पी. दर रुपये २९७०.०४ रुपये येतो. त्यानुसार, कारखान्याने एकूण १४,९९५.६१ लाख एवढी होत आहे त्यानुसार पहिला हप्ता २५०० रुपये, दुसरा हप्ता २०० रुपये याप्रमाणे एकूण दोन हप्त्यांत १२.६२२.४० लाख एवढी रक्कम अदा केली आहे. उर्वरित २७० रुपये याप्रमाणे एकूण १,३६३.४२ लाख रुपये आदेशित करण्यात आले. दरम्यान, समृद्धी साखर कारखान्याच्यावतीने एफआरपीची रक्कम तीन हप्त्यांत देण्याचे निश्चित करण्यात आले असून यासंबंधी समृद्धी कारखान्यास ऊस दिलेल्या शेतकऱ्यांनी त्यासंबंधीचे संमती पत्र दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here