जालना : समृद्धी शुगर्सने यंदाच्या दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात चौथा वाढीव हप्ता जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा हप्ता १०० रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे असणार आहे. कारखान्याचे चेअरमन सतीश घाटगे आणि व्हाइस चेअरमन महेंद्र मेठी यांनी या निर्णयाची माहिती दिली. मराठवाड्यात सर्वाधिक ऊस दर देणारा कारखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कारखान्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
समृद्धी शुगरने गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये उसाला २,९७०रुपये प्रति मेट्रिक टन इतका उच्चांकी भाव जाहीर केला. या उच्चांकी दरामुळे कारखाना ऊस दरात मराठवाड्यात नेहमीच आघाडीवर राहिला आहे. कारखान्याने शेतकऱ्यांना पहिला हप्ता २,५०० रुपये दिला होता. त्यानंतर दुसरा हप्ता २०० रुपये, तिसरा हप्ता १०० रुपये आणि आता चौथा १०० रुपये प्रति मेट्रीक टनाचा हप्ता जाहीर केलेला आहे. दिवाळीसारख्या मोठ्या सणाच्या तोंडावर हा वाढीव हप्ता मिळाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. उच्चांकी दर देण्याचा समृद्धीचा पॅटर्नबद्दल कारखान्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.