जालना : कर्मयोगी कारखान्याने जळीत उसाची बिलातून कपात न करण्याची ‘स्वाभिमानी’ची मागणी

जालना : अंबड व घनसावंगी तालुक्यात दरवर्षी शेकडो एकर ऊस शॉर्ट सर्किटसह अन्य कारणांनी जळीत होतो. जळीत झालेल्या उसाचे वजन घटते त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. तरीही कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ व सागर सहकारी साखर कारखान्यांकडून जळीत उसाची प्रति टन ५०० व १००० रुपये ऊस बिलातून कपात केली जाते. ही अन्याय करणारी लूट थांबवण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी केली आहे. याऐवजी सभासद शेतकऱ्यांचे १५० रुपये आणि बिगर सभासद शेतकऱ्यांचे ३०० रुपये टनाप्रमाणे कपात करण्याचा निर्णय ७ दिवसांत घ्यावा. अन्यथा, संघटनेच्यावतीने कारखान्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

याबाबत काळे म्हणाले की, साखर आयुक्तांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जळीत उसाला ५ ते १० टक्के रक्कम कमी आकारण्यात यावी असा नियम आहे. मात्र समर्थ कारखान्याकडे जळीत ऊस गाळपासाठी आल्यास सभासद शेतकऱ्यांच्या उसातून ५०० रुपये व बिगर सभासद शेतकऱ्यांच्या उसातून १००० रुपये प्रतिटन ऊस बिल कपातीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे कारखाने २० ते ३५ टक्के रक्कम जळीत उसाच्या नावे कपात केली जात आहे. उसाला लागलेल्या आगीत फक्त ऊसच जळतो असे नाही, तर शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन संच, इलेक्ट्रिक मोटारी, सोलार संच, पाइप ,वायर इतर साहित्य जळून खाक होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असतानाही कारखान्याच्यावतीनेही ५०० व १००० रुपये कपात केली जाते. ही कपात जुलमी व अन्याय करणारी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here