कर्नाटक : हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखाना राबवतोय ऊस विकास योजना

बेळगाव : हालसिध्दनाथ सहकारी कारखान्याकडून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली नवनवीन उपक्रम राबविले जातात. सभासदांना एकरी दहा हजार रुपये बिनव्याजी लागवडीसाठी देण्यात येत आहेत. ऊस उत्पादक सभासद आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी ही ऊस विकास योजना सुरू केली आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन कारखान्याचे ऊस विकास अधिकारी विश्वजित पाटील यांनी केले. बोळेवाडी येथे आयोजित ऊस पीक परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.

विश्वजित पाटील म्हणाले, शेतकरी सभासदांसाठी सवलतीत विविध सुविधा दिल्या जात आहेत. ऊस पिकवताना उत्पादनात होणारी घट, वाढता उत्पादन खर्च, खतांच्या वाढलेल्या किमती अशा अडचणी आहेत. त्या दूर करण्याचे प्रयत्न आहेत. यावेळी पाटील यांनी, पूर्वमशागत, जमिनीतील सेंद्रिय कर्ब, माती परीक्षण, नवीन बेणे, रुंद सरीचे महत्व, एकात्मिक अन्नद्रव्य, पाणी व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, ऊस पिकातील आळवणी, फवारणीचे महत्त्व सांगितले. भाजपच्या ग्रामीण महिला विभागाच्या लक्ष्मी खोत, कारखान्याचे संचालक रमेश पाटील, महादेव खोत, अनिल खोत यांनी ऊस विकास योजनेचे कौतुक केले. राजू खोत, चंद्रकांत खोत, मधुकर खोत, अनिल खोत, संजय खोत, सदाशिव कोगले, सदाशिव गवळी, शीतल भैरशेट्टी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here