बेळगाव : शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस पाठवून यंदाचा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. कारखान्यातर्फे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होण्यासाठी विभागीय शेती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. शासनाच्या एफआरपीनुसार सर्व कारखान्यांप्रमाणे उसाला चांगला दर देण्यात येईल, असे कारखान्याचे अध्यक्ष व माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी सांगितले.
कागवाडसह परिसरातील शेतकऱ्यांच्या उसाची वेळेत उचल होण्यासाठी आणि शेतकऱ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी अथणी शुगर्स केंपवाड या कारखान्याच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन माजी मंत्री श्रीमंत पाटील, यतिश्वरानंद महास्वामी व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमास सुभाष कठारे, नेताजी काटे, अजित मगदूम, शिवानंद पाटील, अशोक हावळे, प्रकाश ढंग, प्रा. बी. ए. पाटील, प्रा. अशोक पाटील, मुख्य शेती अधिकारी बी. ए. जगताप, अॅड. शेखर किणगे, विभागीय कार्यालय अधिकारी अजित कोत्तलगे, प्रकाश मिर्जे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.












