नैरोबी : केनियातील साखर कारखान्यांना उसाच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक कारखानदार सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या किमतीच्या जवळपास १६ टक्के जादा दराने उसाची खरेदी करीत आहेत. साखर संचालनालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या महिन्यात साखर कारखान्यांचे ऊस गाळपाचे एकूण प्रमाण जानेवारी महिन्यातील ९,०८,००० च्या तुलनेत ४० टक्क्यांनी घरून ५,४६,००० टन झाले आहे. उसाच्या मर्यादीत पुरवठ्यामुळे कारखानदारांतील स्पर्धेमुळे उसाची किंमत साखर संचालनालयाकडून SH४,५८४ पासून वाढून SH५,२५० पर्यंत पोहोचली आहे.
देशातील साखर उद्योगाला सर्व क्षेत्रांमध्ये उसाचा तुटवडा जाणवत आहे, परिणामी कारखान्यांनी त्यांचे कामकाज आणि उत्पादन कमी केले आहे. साखर संचालनालयाने म्हटले आहे की, ऊसाच्या तुटवड्यामुळे काही कारखानदार अपरिपक्व ऊसाची खरेदी करीत आहेत. त्यामुळे उत्पादन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होईल, अशी शक्यता आहे. साखर उत्पादनातील घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारातील साखरेच्या किमतीवर दिसून आला आहे. सुपरमार्केटमध्ये साखरेच्या किमती फेब्रुवारी महिन्यात दोन किलोच्या पॅकेटसाठी SH२८० होत्या. त्या आता SH३०० झाल्या आहेत.












