कोल्हापूर : येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२४-२०२५ मध्ये गळीतास – आलेल्या ऊस बिलाची प्रतिटन ३१०० रुपयांप्रमाणे रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
पत्रकात म्हटले आहे की, नोव्हेंबर २०२४ अखेर कारखान्याकडे गाळपासाठी आलेल्या ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. संबंधित शेतकऱ्यांनी बँकेशी ऊस बिलासाठी संपर्क साधावा. व्यवस्थापनाने या गळीत हंगामासाठी ११ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. ते पूर्ण करण्यासाठी सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी नोंदविलेला संपूर्ण ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे.












