कोल्हापूर : अन्नपूर्णा शुगर अँड जॅगरी वर्क्स यावर्षी पूर्ण कार्यक्षमतेने चालवणार आहे. कारखान्याच्या पाचव्या, सन २०२५-२६च्या गळीत हंगामामध्ये २ लाख ६० हजार मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक संजय घाटगे यांनी दिली. अडीच लाखांपेक्षा जास्त क्रसिंग वाढविल्याशिवाय आपला कारखाना नफ्यात येणार नाही त्यासाठी क्रशींग वाढवले पाहिजे. म्हणून यंदा क्रशींग वाढविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे असे ते म्हणाले. कारखान्याच्या मिल रोलर पूजन प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
अन्नपूर्णा शुगर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या पूर्वतयारीसाठी मिल रोलरचे पूजन अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर गोकुळचे संचालक अंबरिष घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंबरीष घाटगे म्हणाले, अधिकारी सेवकवर्ग यांच्या बहुमोल सहकार्याबरोबरच शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्याकडे पाठवावा. संचालक दिनकर दौलू पाटील, के. के. पाटील, राजू भराडे, तानाजी पाटील, दत्तोपंत वालावलकर, सोनूसिंह घाटगे, चिफ इंजिनिअर राजू मोरे, चिफ केमिस्ट सुनील कोकीतकर, सिव्हिल इंजिनिअर हंबीरराव पाटील, डी. एस. पाटील, सचिन गाडेकर, मारुती सावंत आदी उपस्थित होते.