कोल्हापूर : असळज (ता. गगनबावडा) येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामातील १६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ चे ऊस बिल जमा केले आहे. १६ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या पंधरवड्यात गाळप केलेल्या ४७ हजार २४८ टन उसाचे प्रतिटन ३४५० रुपयांप्रमाणे बिल देण्यात आले आहे.
ऊस बिलाची रक्कम १६ कोटी ३० लाख ५ हजार संबंधित ऊस पुरवठादार शेतकरी सभासद, बिगर सभासदांच्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिली. कारखान्याने २०२५-२६ च्या गाळप हंगामात ४ लाख ७ हजार ४७२ टन उसाचे गाळप करून ३ लाख ८४ हजार ६५० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. याप्रसंगी कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक जयदीप पाटील, सेक्रेटरी नंदकुमार पाटील, सर्व खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

















