कोल्हापूर : नरंदे येथील शरद सहकारी साखर कारखान्याची २९ वी वार्षिक सभा झाली. यावेळी सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली. माजी नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर प्रमुख उपस्थित होते. कारखान्याचे अध्यक्ष, आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सभेत मार्गदर्शन केले. अडीच हजार मेट्रिक टन गाळपापासून सुरू झालेला कारखाना प्रतिदिन दहा हजार टन गाळप करेल असे नियोजन सुरू आहे. आगामी हंगामात आठ लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आमदार राजेंद्र पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून विक्रमी उत्पादन घेण्याचे तंत्र आत्मसात करणे गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती पाहता कमीत कमी खर्चात जास्तीत उसाचे उत्पादन काढण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे, साखर व्यवसाय कारण जागतिक बाजारपेठेवर अवलंबून आहे. यावेळी आदित्य पाटील-यडावकर उपाध्यक्ष थबा कांबळे, सुभाषसिंग रजपूत, दशरथ पिष्टे, अप्पासाहेब चौगुले, पोपट भोकरे, रावसाहेब कुंभोजे, लक्ष्मण चौगुले, अजित उपाध्ये, शिवगोंडा पाटील, अरुण पाटील, प्रतापराव देशमुख, ताजुद्दीन तहसीलदार, बी. ए. आवटी उपस्थित होते. अदिती चौगुले, चेतना पाटील, अमृततेज खोत, मंजुषा कांबळे, शिवराज ठोंबरे, सुरभी डाळे, आयूब मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला. कार्यकारी संचालक एम. एम. पट्टणकुडे यांनी अहवाल वाचन केले. प्रकाश पाटील यांनी स्वागत केले.