कोल्हापूर : दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार निमशिरगाव परिसर सहकारी कृषी पाणी पुरवठा योजना कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चालविणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक व माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केले. दे. भ. रत्नाप्पाण्णा कुंभार निमशिरगांव परिसर सहकारी कृषी पाणी पुरवठा योजना या संस्थेचे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे हस्तांतरण करण्याबाबत चर्चेसाठी आयोजितविशेष सभेत ते बोलत होते. माजी खा. राजू शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
माजी आमदार आवाडे म्हणाले की, एआय तंत्रज्ञानासाठी १० हजार रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्यापैकी ५० टक्के रक्कम जवाहर कारखाना देईल. सुरुवातीला संपूर्ण १० हजार रुपये कारखाना भरेल आणि शेतकऱ्यांच्या हिश्श्याची ५ हजाराची रक्कम ऊस बिलातून दोन टप्प्यात कपात करुन घेतली जाईल. ठिबक सिंचनसाठी १२ हजारांचे अनुदान खात्यावर जमा केले जाईल. एक्स्प्रेस फिडरसाठीही प्रयत्न करू. सुभाष शेट्टी, पद्माकर पाटील, सावकार मादनाईक, बाबासो चौगुले, सुनिल पाटील, प्रशांत कांबळे, दादासो सांगावे, गौतम इंगळे, संजय कोथळी, प्रकाश खोबरे, किरण कांबळे आदी उपस्थित होते.