कोल्हापूर : गुरुदत्त शुगर्स कारखाना कार्यस्थळावर विद्युत सुरक्षा सप्ताह

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यातील श्री गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी येथे शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या वतीने विद्युत सुरक्षा सप्ताह उत्साहात झाला. अधिकारी व कर्मचारी यांना विद्युत सुरक्षा कशा पद्धतीने करावी, याची शपथ सेफ्टी ऑफिसर काझी यांनी दिली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रंगाप्रसाद म्हणाले, प्रत्येक कर्मचारी प्रत्येक कर्मचाऱ्याने कारखान्यात किंवा घरी विद्युत सुरक्षिततेबाबत सतर्क राहिले पाहिजे. यांनी कारखान्यात किंवा घरी विद्युत सुरक्षिततेबाबत दक्ष आणि सतर्क राहिले पाहिजे. तसेच विद्युत उपकरणे हाताळताना कर्मचारी यांनी योग्य समन्वय राखत आणि धांदल न करता व्यवस्थितपणे काम पार पाडल्यास ते कोणत्याही आपत्तीविना यशस्वी होऊ शकते. इलेक्ट्रिकल व्यवस्थापक सुनील राजमाने यांनी विद्युत सुरक्षिततेबाबत कर्मचारी व अधिकाऱ्यांना माहिती दिली. विद्युत सुरक्षितेबाबत यावेळी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here