कोल्हापूर : ‘गोडसाखर’चे १२ कोटी ७८ लाख रुपये ऊस आणि तोडणी वाहतूक बिल जमा

कोल्हापूर : अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याची (गोडसाखर) ऊस बिले शेतकऱ्यांच्या व तोडणी वाहतूक बिले वाहतूक कंत्राटदारांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. संबंधित बँकेशी संपर्क साधून उचल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गडहिंग्लज साखर कारखान्याला २०२५-२६ च्या गळीत हंगामात १ जानेवारी ते १५ जानेवारी या पंधवड्यात ऊस गाळपास आला होता. या उसाचे प्रतिटन ३४०० रुपये दराप्रमाणे विनाकपात १२ कोटी ७८ लाख ६० हजार ९८९ रुपये होतात.

ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. तर १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीतील सेवा संस्था वसुलीची रक्कम सेवा संस्थांकडे वर्ग करण्यात आली आहे. तसेच १६ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीतील तोडणी वाहतूक बिलाचे वसुली वजा करून ९९ लाख ४७ हजार १७८ रुपये होतात. सदरची रक्कम तोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या खात्यावर जमा केली आहे. शेतकरी व तोडणी वाहतूक कंत्राटदारांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून उचल करावी, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश पताडे, उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here