कोल्हापूर : उसावर खोड अळीचा प्रादुर्भाव, दानोळी परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्पादन घटण्याची भीती

कोल्हापूर : शिरोळ तालुक्यात अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. २६५ या वाणाच्या ऊस पिकावर खोड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे. दानोळी व परिसरातील कोथळी, कवठेसार, उमळवाड, निमशिरगाव आदी भागांत ऊस हे हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून ओळखले जाते. मोठ्या प्रमाणात शेतकरी उसाची लागवड करतात. मात्र, रासायनिक खते, कीडनाशके, मजुरी, मशागतीची साधने आणि इतर उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत असतानाच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

खोड अळी उसाच्या खोडात प्रवेश करून आतील भाग पोखरते. त्यामुळे उसाच्या खोडामधून चिकट द्रव बाहेर येताना दिसतो. पानांची वाढ खुंटते, काही ठिकाणी मध्यवर्ती को सुकून जातो, तर अनेक उसाचे कांड वाळलेले दिसून येत आहेत. याबाबत दानोळीतील ऊस उत्पादक शेतकरी भरत माणगावे यांनी सांगितले की, खोड अळीही उसातील गंभीर कीड असून, तिच्या प्रादुर्भावामुळे उसाच्या आतील ऊतकाचे नुकसान होते. त्यामुळे उसाधी वाढ थांब कांडाची जाडी व तांबी कमी होते आणि साखरेचे प्रमाण घटते वेळेवर नियंत्रण न ठेवल्यास उत्पादनात लक्षणीय घट होते. तर कृषी सहाय्यक ज्योती भाटे यांन दानोळी परिसरातील काही ठिकाणी कीड दिसत आहे. त्याबाबत उपाययोजना आम्ही शेतकऱ्यांना सांगत आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपाययोजना करीत आहोत, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here