कोल्हापूर : ‘दत्त-शिरोळ’च्यावतीने ऊसतोड मजुराच्या कुटुंबीयांना विमा पॉलिसी धनादेश प्रदान

कोल्हापूर : शिरोळ येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अपघातग्रस्त व मृत झालेल्या ऊसतोड मजुरांच्या कुटुंबीयांना अपघात विमा पॉलिसीचा धनादेश देण्यात आला. कारखान्याच्या वतीने ऊसतोडणी मजुरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अपघात विमा पॉलिसी काढली जाते. दुर्दैवाने एखाद्या ऊसतोड मजुराचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याला विम्याची रक्कम पॉलिसीमुळे मिळते.

पॉलिसी अपघातग्रस्त व मृत झालेल्या ऊसतोड मजुरांच्या कुटुंबीयांना अपघात विमा पॉलिसीचा धनादेश देण्यात आला. श्रवण बाबूराव राठोड (रा. नरवाडी ता. सोनपेठ, जि. परभणी) यांचा मे २०२५ मध्ये साप चावून मृत्यू झाला होता. पॉलिसी अंतर्गत त्यांचे वारस शोभा श्रावण राठोड यांना तीन लाख रुपयाचा धनादेश दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी धनाजी पाटील-नरदेकर, रावसाहेब आबदार, शिवाजीराव देशमुख, उदय शिलेदार, कल्लेश्वर वाघमोडे, श्रीशैल हेगान्ना, अमर चौगुले, सदानंद कुलकर्णी, आदींसह मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here