कोल्हापूर : कुडित्रे येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्यास देशातील राष्ट्रीय स्तरावरील सर्वाधिक उच्च साखर उतारा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते कारखान्याचे व्हा. चेअरमन राहुल खाडे, संचालक उत्तम वरुटे आणि कार्यकारी संचालक धीरजकुमार माने यांनी न्यू दिल्ली येथे स्वीकारला. नॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते पुरस्कार देण्यात आला.
कारखान्याने हंगाम २०२३-२४ मध्ये ६,९७,६८२.६९५ मे. टन गळीत करून ८.९६.९५० क्विटल साखर पोत्यांचे उत्पादन केले असून, सरासरी साखर उतारा १२.८३ टक्के राहिला होता. हा पुरस्कार सर्व उत्पादक सभासद, शेतकरी यांना अर्पण करीत आहोत, असे आ. नरके यांनी सांगितले. यावेळी सर्व संचालक मंडळ, कामगार प्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.