कोल्हापूर : लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्यात मिल रोलर पूजन

कोल्हापूर : हमिदवाडा (ता. कागल) येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील मिल रोलर पूजन उपाध्यक्ष आनंदा फराकटे यांच्या हस्ते, तर धार्मिक विधी संचालिका मंगल रामगोंडा तुकान यांच्या हस्ते करण्यात आले.

कारखान्याचे सरव्यवस्थापक एस. एच. संकपाळ यांनी स्वागत केले. यावेळी संचालक वीरेंद्र मंडलिक, सत्यजित पाटील, शिवाजीराव इंगळे, विश्वास कुराडे, प्रदीप चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कृष्णा शिंदे, तुकाराम ढोले, पुंडलिक पाटील, महेश घाटगे, नेताजी पाटील, विष्णू बुवा, प्रतिभा पाटील, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, सर्जेराव पाटील उपस्थित होते. चिफ केमिस्ट विक्रमसिंह पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here