कोल्हापूर : येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याने गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल कारखान्याचे संचालक वीरेंद्र मंडलिक यांनी शेतकरी व कारखान्याच्या विविध घटकांचे अभिनंदन केले. कारखान्याने पुढील हंगामासाठी विशेष करून वेळेत अधिकाधिक ऊस आणण्याचे नियोजन आतापासूनच सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याच्यावतीने आगामी २०२६-२७ या गळीत हंगामासाठी लगेच ऊस तोडणी वाहतूक करार सुरू करण्यात आले आहेत. या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
कारखान्याचे उपाध्यक्ष आनंदराव फराकटे, संचालक वीरेंद्र मंडलिक व कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील यांच्या हस्ते या करारांचा प्रारंभ करण्यात आला. कारखान्याचे संचालक धनाजी बाचनकर, नेताजी पाटील, तुकाराम ढोले, भगवान पाटील तसेच माजी शेती अधिकारी प्रतापराव मोरबाळे, तोडणी वाहतूकदार सागर आंगज, तुकाराम माणगावकर आदी उपस्थित होते. मुख्य शेती अधिकारी श्रीनिवास कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. केनयार्ड सुपरवायझर अनिल राऊत यांनी आभार मानले.


















