कोल्हापूर : देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी कबनूरचे पी. एम. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी शिरोळचे प्रताप ऊर्फ बाबा पाटील यांची बिनविरोध निवड झाली. कारखाना कार्यस्थळावर जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड झाली. अध्यक्षपदासाठी पी. एम. पाटील व उपाध्यक्षपदासाठी प्रताप पाटील या दोघांचेच अर्ज आले. दोन्ही पदांसाठी एक-एक अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.
नूतन संचालक असे..: पी. एम. पाटील (कबनूर), कुमार खूळ (रुई), प्रताप ऊर्फ बाबा पाटील (शिरोळ), रावसाहेब भगाटे (नांदणी), प्रताप नाईक (घालवाड), प्रमोद पाटील (कबनूर), प्रकाश खोबरे (तारदाळ), बापू मोटे (पट्टणकोडोली), विशाल आवटी (अकिवाट), संजय देसाई, महावीर चौगुले (माणकापूर), बाबासाहेब पाटील (हसूर), धनगोंडा पाटील (कोथळी), संतोष महाजन (माणगाव), भूपाल मिसाळ (घोसरवाड), रंजना निंबाळकर (हेरले), शोभा पाटील (नेज).
















