कोल्हापूर : ‘गुरुदत्त शुगर्स’मध्ये विविध उपक्रमांनी सुरक्षा सप्ताह साजरा

कोल्हापूर : राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून राष्ट्रीय सुरक्षा दिनानिमित्त टाकळीवाडी (ता. शिरोळ) येथील गुरुदत्त शुगर्समध्ये विविध उपक्रमांनी सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. सीईओ आर. रंगाप्रसाद यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. सेफ्टी ऑफिसर अझरुद्दीन काझी यांनी सर्वांना सुरक्षिततेची शपथ दिली.

यावेळी रंगाप्रसाद म्हणाले, सर्व कामगार व अधिकारी यांनी कारखान्यात काम करीत असताना अपघात होऊ नये यासाठी हेल्मेट, सेफ्टी बुट यांसह सर्व सेफ्टी साधनाचा वापर करावा. अधिकारी व कर्मचारी यांनी सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून विना अपघात काम केल्यास कामगारांची, कारखान्यांची तसेच राष्ट्राची प्रगती होते. तसेच कामगारांनी दिलेल्या नियमावलीप्रमाणे व सुरक्षा साहित्याचा वापर केल्यास अपघात रोखण्यासाठी मदत होते. सुरक्षा सप्ताहनिमित्त कामगारांत सेफ्टी निबंध, कविता, स्लोगन स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी कारखान्याचे सर्व खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here