कोल्हापूर : ‘स्वाभिमानी’चे आंदोलन; दालमिया, डी. वाय. कारखान्यांची ऊस वाहतूक रोखली

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी रात्री आठ वाजता कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर कोपार्डे येथे आंदोलन करत दालमिया व डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे ऊस वाहतूक करणारे सात ट्रॅक्टर रोखून धरले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखान्याचे अधिकारी या ठिकाणी यावेत, अशी भूमिका घेतली होती. यावेळी शेकडो कार्यकर्ते जमले. यानंतर दालमिया कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी येऊन ऊसतोडी थांबवितो व दर जाहीर करू, असे आश्वासन दिल्यानंतर ट्रॅक्टर सोडण्यात आले.

ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांच्यावतीने आंदोलन पुकारण्यात आले असतानाच ऊस तोडी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे संतप्त भावना व्यक्त होत आहेत. दालमिया साखर कारखान्याने काल ऊसतोडी सुरू केल्याने त्यांचे पाच ट्रॅक्टर येथे अडवून धरण्यात आले. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचीही ऊस वाहतूक रोखून धरण्यात आली. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी बोलताना बाजीराव देवाळकर म्हणाले, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांनी ३७५१ रुपये एक रकमी एफआरपी जाहीर केल्यानंतरच ऊसतोडी सुरू कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here