कोल्हापूर : इथेनॉल वाहतूक करणारा टँकर करुळ घाटात पलटला; चालक जखमी

कोल्हापूर : सोमवारी रात्री इथेनॉल वाहतूक करणारा टँकर करुळ घाटात पलटी झाला. या अपघातामध्ये चालक जखमी झाला. या अपघातानंतर टँकरमधून ज्वालाग्रही इथेनॉलची गळती झाली, मात्र वैभववाडी व गगनबावडा पोलीस, अग्निशामक दल यांच्या अथक परिश्रमामुळे अनर्थ टळला. कोल्हापूर येथून इथेनॉल घेऊन टँकर गोव्याकडे निघाला होता. करुळ घाटात चालकाचा गाडीवरील ताबा सुटून तो रस्त्याकडेला पलटी झाला. अपघातानंतर चालक टँकरमध्येच अडकलेल्या अवस्थेत होता.

या घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक, अग्निशामक दलाचे जवान तसेच गगनबावडा पोलिसांनी संयुक्तपणे मदतकार्य हाती घेतले. चालकाला बाहेर काढण्यासाठी क्रेन, जेसीबी आणि फायर ब्रिगेडची मदत घेण्यात आली. अथक प्रयत्नांनंतर चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दरम्यान, कोल्हापूर येथून आलेल्या अग्निशामक दलाच्या पथकाने इथेनॉलची गळती थांबवून योग्य ती खबरदारी घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here