कोल्हापूर : कागलच्या छत्रपती शाहू कारखान्यामध्ये लिक्विड फूड ग्रेड प्रकल्प कार्यान्वीत

कोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने संस्थापक विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या कारकिर्दीपासून केवळ साखरेच्या उत्पादनावर अवलंबून न राहता सहवीज, इथेनॉल, आसवनी, बायोगॅस, बायोपोटॅश आणि इतर उपपदार्थ निर्मिती प्रकल्पांची या आधीच उभारणी केली आहे. यामध्ये नवीन प्रकल्पाच्या उभारणीमुळे भर पडली आहे. प्रकल्पातून उच्च प्रतीचा फूड ग्रेड लिक्विड कार्बन डायऑक्साइड आणि ड्राय आईस तयार होणार आहे, अशी माहिती शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी दिली. कारखाना कार्यस्थळावर लिक्विड फूड ग्रेड कार्बन डाय-ऑक्साइड प्रकल्पाचे उद्घाटन व या प्रकल्पातून उत्पादित पहिल्या टँकरचे पूजन व वितरणप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील यांच्यासह सर्व संचालक व शाहू ग्रुपमधील संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शाहू कारखाना लवकरच बायो सीएनजी प्रकल्प उभारणीचे काम हाती घेणार आहे, अशी माहिती समरजितसिंह घाटगे यांनी दिली. यावेळी समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते या प्रकल्पाची यशस्वीपणे उभारणी केल्याबद्दल माणिक पाटील यांचा सत्कार केला. कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण म्हणाले की, ‘शाहू कारखान्याने आता डिस्टिलरीतील प्रक्रिया करून कार्बन डाय-ऑक्साइड तयार करणारा प्रकल्प बूट बेसवर उभारला आहे. यामधील कार्बन डाय-ऑक्साइड शीतपेय, फूड इंडस्ट्रीसाठी उपयुक्त ठरणार आहे.’ यावेळी संचालक युवराज पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here